‘शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवी येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.
११ हजार हेक्टर जागेची गरज
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूंसापदन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.












