Category Archives: कोकण

मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर परवा मंगळवार दिनांक २३ जानेवारी रोजी कोकण रेल्वेच्या वीर ते अंजनी स्थानक या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण अडीच तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १३:१० ते १५:४० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central ‘Netravati’ Express 
दिनांक २३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते वीर या स्थानकांदरम्यान ४० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते चिपळूण या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
३) Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Express
दिनांक २२ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते चिपळूण या स्थानकांदरम्यान ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.

Loading

नागपूर – पत्रादेवी ‘शक्तिपीठ’ महामार्ग ‘समृध्दी’ पेक्षाही मोठा; ८०५ किमी लांबीचा हा महामार्ग ठरणार राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग.

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग  यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून जाणार आहे. 

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक गाडी LHB कोचसहित धावणार

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12741/12742 वास्को द गामा – पटना सेमी फास्ट एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 जानेवारी पासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे. 

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वास्को द गामा ते पटना (12741) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 24 जानेवारी 2024 च्या फेरीपासून तर पटना ते वास्को (12742) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 27 जानेवारी 2024 च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी 22 डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती 21 एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे. 

या साप्ताहिक गाडीला कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी आणि चिपळूण या स्थानकांवर थांबे आहेत. 

 

Loading

सिंधुदुर्गात १६२६ ‘आदिम’ लोकसंख्येचा पीएम जनमन योजनेअंतर्गत होणार विकास

सिधुदुर्ग: केंद्राने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान तथा पीएम जनमन अभियान सुरू केले असून त्यामध्ये जिल्ह्याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत १६२६ आदिम समाजाचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० वाड्यांमध्ये या समाजाचे वास्तव्य असल्याचेही पुढे आले आहे. आता या समाजाला रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, नळपाणी पुरवठा योजना आदी महत्त्वाच्या सुविधा या अभियान अंतर्गत देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (पीएमएवाय – जी) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला आहे 
दुर्लक्षित घटकातील अगदी शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांच्या अंत्योदयाच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, 15 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने, विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या (पीव्हीटीजीएस) सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आले.
सुमारे  24,000 कोटी रुपयांची पीएम जनमन योजना  9 मंत्रालयांच्या माध्यमातून 11 प्रमुख उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते.विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहातील (पीव्हीटीजीएस) कुटुंबे आणि  लोकवस्त्यांना सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, वीज, रस्ते आणि दूरसंचार  यासारख्या मूलभूत सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करून या घटकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.


देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले या पाच तालुक्यांत ही वस्ती आहे. यातील १६ वाड्यांतील आदिम समाजाजवळ कच्चे घर सुद्धा राहण्यासाठी आढळलेले नाही. केवळ एकच वाडी जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सहा वाड्यांत प्राथमिक शाळा नाहीत. चार वाड्यांना अंगणवाडी केंद्र नाही. तीन वाड्यांना आरोग्य केंद्र नाही. १९ वाड्यांत कौशल्य विकास केंद्र नाही. १३ वाड्यांत स्वच्छ पाणी नाही. सात वाड्यांत नळपाणी पुरवठा करणारी योजना नाही. १३ वाड्यांत वीज पुरवठा नाही. १५ घरांत सार्वजनिक शौचालय नाही, असे या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.
जिल्ह्यात आदिम समाजाचे वास्तव्य आढळलेल्या २० वाड्यांमध्ये केंद्राच्या प्रत्येक योजना अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. ज्या योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. व्यक्तिगत लाभ मिळालेला नसल्यास तोही दिला जाणार आहे.

Loading

मडगाव – अयोध्या दरम्यान साप्ताहिक रेल्वे चालविण्याची मागणी

Konkan Railway News :अयोध्येत २२ जानेवारीला राममंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा होत आहे. त्यापूर्वी देशभरातून अनेक रामभक्त अयोध्येला भेट देत आहेत. अयोध्या जगातील एक मोठ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. दरवर्षी देशभरातून हजारो रामभक्त अयोध्येला भेट देणार आहेत. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येत जाण्यासाठी रेल्वे आठवड्यातून एकदा सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर केली आहे. याबाबत कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन सादर केले आहे.

 

Loading

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कोकण विभागातून वेंगुर्ला नगरपालिका अव्वल

सिंधुदुर्ग: वेंगुर्ले नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ले शहरास जीएफसी १ स्टार व ODF ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

नगरपरिषद मार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लेवासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.

 

 

Loading

कोकणचा सुपुत्र ठरला गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर; शोधून काढले सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान

Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुपुत्र चंद्रकांत काजरेकर गिनीज बुक रेकॉर्ड होल्ड ठरले आहेत.शेती आणि बागायतदार चंद्रकांत काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले आहे.  

 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी आणि नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले चंद्रकांत काजरेकर आंबा आणि काजू बागायतीची आवड जोपासत असताना त्यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुली डॉ. नालंदा आणि डॉ. नुपूर आणि जावई धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.

त्यानंतर पूर्णतपासनीचे रेकॉर्ड तयार करताना संत राहुल महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकुर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत आणि प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वल्डे वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपुर, जावई धीरज, डॉ. देवेंद्र तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभले.

जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदवले गेले आहे. या पानाची लांबी ५५.६ सेमी रुंदी १५.६ से.मी. आहे त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे, सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.

Loading

तळ कोकणातील पहिल्या बीपीओ सेंटरचे सावंतवाडीत उद्घाटन

सावंतवाडी: व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत झाले. तळकोकणातील हे पहिले पहिल्या बी पी ओ सेंटर ठरले आहे.
सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कंपनीच्या माध्यमातून दोनशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेली असून अजून तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोकणवासियांसाठी काहीतरी करावं ही व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे साबळे यांची इच्छा होती. या उद्देशानेच त्यांनी मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस तयार केला होता. या त्यांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थानं यश मिळालं आहे. कोकणात अनेक तरुणांना यापुढ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे. सावंतवाडी मधील जिमखाना मैदाना शेजारील भव्य इमारतीमध्ये व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेले बीपीओ सेंटर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेले पहिल बिपिओ सेंटर ठरलं आहे. सिक्युअर क्रेडेनशियल ,स्ट्रायकर, एफ एस आणि arrise च्या वाढत्या क्लाइंटबेससह डेटा एन्ट्री अकाउंटिं,बॅकग्राऊंड वेरिफिकेशन, डेट रिकवरी यासारख्या सेवांचा समावेश सावंतवाडीतल्या बीपीओ सेंटर मध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून बहुउपयोगी फिजिटल पायाभूत सुविधांचा आणि त्याच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनी ने सिंधुदुर्ग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात एक उत्तुंग असं पाऊल टाकलं आहे. ग्राहकांसाठी व्हरेनियम क्लाऊड लिमिटेडने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड प्रधान कार्यालया च्या उदघाटन सोहळ्यास मॕनेजिंग डायरेक्टर -मा.हर्षवर्धन साबळे , हायड्रा ओपरेशन हेड -अनुष्का लोध, टेक्निकल कन्सलटंट- मुकुंदन राघवन, सावंतवाडी हेड-विनायक जाधव, अॕडमीन -संदिप नाटलेकर, प्रोजेक्ट इंजिनियर -लक्ष्मण नाईक, सतीश पाटणकर, साहील नाईक,ओंकार सावंत व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Loading

Mumbai Trans Harbour Link (MTHL): वेग मर्यादा 100 किमी/तास, बाईक आणि ऑटो साठी ‘नो एन्ट्री’; ‘हे’ असतील टोलचे दर

Mumbai Transharbour Link Road :देशाचे पंत्रपधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उदघाटन होणाऱ्या देशातील सर्वात लांब समुद्री महामार्ग अशा ‘मुंबई ट्रान्सहार्बर लिंक ’ अर्थात अटल बिहारी वाजपेयी सेवरी न्हावा शेवा अटल सेतूवर  कमाल १०० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा राहणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार चार चाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा १०० किलोमीटर प्रतितास राहणार आहे. तर पुलाच्या सुरवातीला चढणीला आणि शेवटी उतरताना ताशी 40 किलोमीटरपर्यंत मर्यादित असेल. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी या महामार्गावर प्रवेश असणार नाही.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष).

Loading

अबब! मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवासासाठी कोकणकरांना मोजावे लागणार ‘एवढे’ रुपये

Mumbai : राज्य सरकारने गुरुवारी बहुचर्चित देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर  (MTHL) वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या टोल रकमेची निश्चिती केली आहे.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत. ठाणे खाडीवरील शिवडी (Shivdi) ते नवी मुंबई (New Mumbai) या 22 किमी लांबीच्या पुलाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष).
या महामार्गाच्या टोलच्या दरांवरून समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिकिया मिळत आहे. काहींच्या मते सरकारने टोल चे दर कमी करावेत. मात्र काहींच्या मते या महामार्गामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे त्यामुळे हे दर रास्त आहेत.   

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search