मुंबई, दि. ८ ऑक्टोबर : मुंबईवरून मडगावकडे जाणाऱ्या १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये आज तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवाशांकडे कन्फर्म तिकीटे असलेला DL-1 डबा गाडीला लावण्यातच आलेला नव्हता.
या अनपेक्षित घटनेमुळे गाडीत गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. परिस्थिती हाताळताना रेल्वेतील टीसी आणि कर्मचारी देखील अडचणीत सापडले.
टीसींनी प्रवाशांना या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदविण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली असून, हा प्रकार रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे
Category Archives: कोकण रेल्वे
Konkan Railway: वास्को-द-गामा : प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-द-गामा साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 07311/07312) आता पारंपरिक आयसीएफ डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी डब्यांसह धावणार आहे.
ही सुविधा 22 सप्टेंबर 2025 पासून वास्को-द-गामा येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07311 साठी लागू होणार असून, मुझफ्फरपूर येथून 25 सप्टेंबर 2025 रोजी सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07312 पासून अमलात येईल.
रेल्वेच्या माहितीनुसार, या गाडीत यापुढे एक फर्स्ट एसी, दोन टू टियर एसी, तीन थ्री टियर एसी, नऊ स्लीपर, तीन जनरल, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर असा एकूण 20 एलएचबी डब्यांचा समावेश असेल. पूर्वी या गाडीत 21 आयसीएफ डबे जोडले जात होते.
प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. संबंधित गाडीचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या बदलामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या सेवांचा अधिक सोयीस्कररीत्या लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.
Konkan Railway Updates: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आज नव्याने डिझाईन केलेले KR MIRROR मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले. हे अॅप्लिकेशन प्रवाशांना आधुनिक, सुलभ आणि समावेशक डिजिटल अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
हे अॅप्लिकेशन केवळ माहिती देणारे साधन न राहता आता एक संपूर्ण प्रवास साथीदार ठरत आहे. दृष्टी, हालचाल किंवा संज्ञानात्मक अडचणी असलेल्या प्रवाशांनाही सहज वापरता येईल, याची काळजी घेण्यात आली आहे. बहुभाषिक पर्याय, मोठ्या अक्षरे, तसेच डार्क/लाईट मोडसारख्या सुविधा यात उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या सुविधा:
-
गाडीचे प्रत्यक्ष धावते स्थिती व वेळापत्रक
-
स्थानकांवरील व गाड्यांवरील सेवा, केटरिंग माहिती
-
महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा व सुरक्षा हेल्पलाईन्स
-
पर्यटन व चित्रपट स्थळांची माहिती, छायाचित्रे
-
हेल्पडेस्क व तक्रार नोंदविण्याचे पर्याय
-
कोकण रेल्वेचा इतिहास, कामगिरी व घोषणा
-
आपत्कालीन माहिती व सुरक्षा सुविधा
प्रवासी लाभ:
या अॅप्लिकेशन द्वारे प्रवाशांना जलद माहिती, सुरक्षा जागरूकता, पर्यटन नियोजन, स्थानिक भाषांतील माहिती तसेच थेट KRCL शी संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे.
हे अॅप्लिकेशन आता Google Play Store वर डाउनलोडसाठी उपलब्ध असून, खालील लिंकवर जाऊन ते डाउनलोड करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.konkanrailway.krclapp
खेेड: लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (०१४६३/०१४६४) विशेष गाडी पुजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सव काळात चालविण्याची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. मात्र या गाडीला खेेड स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जल फाउंडेशन कोकण विभागाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव यांनी या संदर्भात निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे. उन्हाळी २०२५ विशेष गाड्यांच्या वेळी खेेड येथे थांबा देण्यात आला होता. मात्र आता तो रद्द करण्यात आला असून त्यामागचे कारण जनतेला समजत नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, “कोकण रेल्वेकडून महाराष्ट्रातील स्थानकांकडे कायम दुय्यम दृष्टीने पाहिले जाते. केरळ व इतर दक्षिणेकडील प्रवाशांच्या मागण्या मान्य करून त्यांना पुरेसे थांबे दिले जातात. पण कोकणवासीयांच्या सोयीसाठी वारंवार दुर्लक्ष केले जाते. हा अन्याय व पक्षपात आहे.”
खेेड हे तालुक्याचे ठिकाण असून हजारो प्रवाशांसाठी ते महत्त्वाचे स्थानक आहे. ही गाडी पुढे नियमित सेवेतही रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना आंदोलन करावे लागू नये म्हणून तातडीने खेेड येथे थांबा निश्चित करणे आवश्यक असल्याची ठाम मागणी जाधव यांनी केली आहे.
अन्यथा हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला जाईल व प्रवाशांना संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई : आगामी दसरा व दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना या गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार असून, दोन साप्ताहिक विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
१) गाडी क्रमांक ०१४६३ / ०१४६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक दर गुरुवार २५/०९/२०२५ ते २७/११/२०२५ रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक दर शनिवारी २७/०९/२०२५ ते २९/११/२०२५ रोजी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी दुपारी ०१:०० वाजता गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकदुर्ग रोड, कुंडुरा, मुकदुर्ग रोड, सुर्थकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, अलुवा, एर्नाकुलम जंक्शन, कोट्टायम, चांगनासेरी, त्रिउवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, सस्थानकोट्टा आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २२ एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.
२) गाडी क्रमांक ०११७९ / ०११८० लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०११७९ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी १७/१०/२०२५ ते ०७/११/२०२५ रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११८० सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी १७/१०/२०२५ ते ०७/११/२०२५ रोजी रात्री २२:२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्टेशनवर थांबेल.
रचना: एकूण २२ एलएचबी कोच = पहिला एसी – ०१ कोच, २ टियर एसी – ०३ कोच, ३ टियर एसी – ०७ कोच, स्लीपर – ०८ कोच, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२.
गाडी क्रमांक ०११८० चे बुकिंग ११/०९/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
सावंतवाडी : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील इंद्राली येथील उडुपी रेल्वे स्थानकाचे नामकरण “उडुपी श्री कृष्णा रेल्वे स्टेशन” करण्यासाठी खासदार श्रीनिवास पूजारी यांनी केलेल्या मागणीवर रेल्वे बोर्डाने सकारात्मक पावले उचलली असून, या संदर्भात कोकण रेल्वेला पत्र पाठवले आहे.
मात्र दुसरीकडे, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा होत असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिक व जनमानसांची ठाम मागणी आहे की, सावंतवाडी स्थानकाला परिपूर्ण टर्मिनसचा दर्जा देऊन त्याचे नामकरण “प्रा. मधू दंडवते सावंतवाडी टर्मिनस” असे करण्यात यावे. कोकण रेल्वेच्या स्थापनेत आणि विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दंडवते यांच्या नावाने स्थानकाला नामांकित करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
Konkan Railway: कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक खुशखबर आहे. गणपती उत्सव २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चिपळूण – पनवेल – चिपळूण दरम्यान अजून काही अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या (मेमू) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत.
गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ चिपळूण – पनवेल – चिपळूण मेमू अनारक्षित विशेष:
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष ०३/०९/२०२५ (बुधवार) आणि ०४/०९/२०२५ (गुरुवार) रोजी चिपळूणहून सकाळी ११:०५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ४:१० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५९ पनवेल – चिपळूण मेमू अनारक्षित स्पेशल गाडी ०३/०९/२०२५ (बुधवार) आणि ०४/०९/२०२५ (गुरुवार) रोजी पनवेलहून सायंकाळी ४:४० वाजता सुटेल. गाडी त्याच दिवशी रात्री २१:५५ वाजता चिपळूणला पोहोचेल.
ही गाडी अंजनी, खेड, कळंबनी बुद्रुक, दिवांखावती, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्टेशनवर थांबेल.
रचना: एकूण ०८ मेमू कोच.
मुंबई : आगामी गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक विशेष गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. ही गाडी रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री निघणार आहे.
०१२३३ क्रमांकाची ‘लोकमान्य टिळक टर्मिनस–सावंतवाडी रोड गणपती विशेष गाडी’ लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १ वाजता (२४ ऑगस्टच्या मध्यरात्री) सुटेल आणि सावंतवाडी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३:१५ वाजता पोहोचेल.
आरक्षण : २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.
थांबे : ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड़, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.
संरचना :
-
१ एसी टू टायर
-
६ एसी थ्री टायर
-
९ स्लीपर
-
९ सामान्य अनारक्षित
-
२ एसएलआर
-
२ जनरेटर
प्रवासी रेल्वे गाड्यांचे तपशील जाणून घेण्यासाठी enquiry.indianrail.gov.in तसेच RailOne, NTES अॅपचा वापर करू शकतात.
मुंबई, दि. 22 ऑगस्ट 2025 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – माडगाव (MAO) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. 22229/22230) मध्ये तात्पुरत्या काळासाठी आठ डब्यांऐवजी सोळा डबे लावले जाणार आहेत.
रेल्वेच्या सूचनेनुसार, सध्या या गाडीत ८ डब्यांचा वंदे भारत रेक आहे. मात्र प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्यासाठी वंदे भारत आता १६ डब्यांच्या रेकसह धावणार आहे. ही वाढीव सुविधा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी कोणत्या दिवशी सुविधा?
मुंबईहून (गाडी क्र. 22229) : 25 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 29 ऑगस्ट 2025
माडगावहून (गाडी क्र. 22230) : 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट 2025
प्रवाशांना होणारा फायदा
या बदलामुळे हजारो प्रवाशांना अतिरिक्त आसनांची उपलब्धता होणार आहे. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत प्रवासी तिकिटांची प्रचंड मागणी असते. त्यामुळे प्रवाशांना या तात्पुरत्या वाढीव डब्यांचा मोठा लाभ मिळेल, अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे.
आरक्षणाची सोय
वाढीव डब्यांनुसार आरक्षण व्यवस्थाही तत्काळ अद्ययावत करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. प्रवाशांनी आपली तिकिटे वेळेत आरक्षित करून घ्यावीत, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
“प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आम्ही तात्पुरती ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आगामी सणासुदीमध्ये प्रवाशांना प्रवासाचा त्रास होऊ नये हीच आमची भूमिका आहे,” असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वास्को:प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेने वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-दा-गामा एक्स्प्रेस विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी व छठपूजा उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या गाड्यांचा तपशील:
-
गाडी क्रमांक 07311 वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर एक्स्प्रेस विशेष
-
धावणार : प्रत्येक सोमवार
-
कालावधी : 08.09.2025 ते 22.12.2025 पर्यंत
-
-
गाडी क्रमांक 07312 मुझफ्फरपूर – वास्को-दा-गामा एक्स्प्रेस विशेष
-
धावणार : प्रत्येक गुरुवार
-
कालावधी : 11.09.2025 ते 25.12.2025 पर्यंत
-
सुधारित वेळापत्रक (प्रमुख थांबे):
-
गाडी क्र. 07311 (सोमवार)
-
वास्को द गामा : 14:30
-
मडगाव : 16:00 / 16:20
-
थिवी : 17:10 / 17:12
-
सावंतवाडी रोड : 17:42 / 17:44
-
रत्नागिरी : 20:50 / 20:55
-
चिपळून : 22:38 / 22:40
-
-
गाडी क्र. 07312 (शनिवार)
-
वास्को द गामा : 14:55
-
मडगाव : 12:30 / 12:50
-
थिवी : 10:30 / 10:32
-
सावंतवाडी रोड : 10:00 / 10:02
-
रत्नागिरी : 06:40 / 06:45
-
चिपळून : 03:26 / 03:28
-
रोहा ते मुझफ्फरपूर दरम्यानच्या थांब्यांच्या वेळेत कोणताही बदल नाही. प्रवाशांनी नवीन वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाची आखणी करावी, असे कोकण रेल्वेने आवाहन केले आहे.










