Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
कलाकृतीच्या वैभवाला रसिकतेचा साज - Kokanai

कलाकृतीच्या वैभवाला रसिकतेचा साज

अभिजात कलाकृतीतून कलाकार घडत जातो. कलाकाराने रंगलेपनसह साकारलेले अनेक वास्तववादी कलात्मक लेपन व त्यातून साधलेला एक रम्य व नादमय अविष्कार यामुळे त्याचे प्रत्येक चित्र आकर्षक व विलोभनीय वाटते. आपल्या अद्भुत कलाविष्कारांनी रसिकांच्या चक्षूंचे पारणे फेडणाऱ्या नामवंत कलाकारांपैकीच एक सिद्धेश श्रीपतराव सुर्वे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून कलेची उपासना करणाऱ्या या कलाकाराचे चित्रकलेसाठी असणारे योगदान अतुल्य आहे. व्यक्तिचित्रे रेखाटण्यात माहीर असलेल्या या कलाकाराने आतापर्यंत जवळपास अनेक चित्रप्रदर्शनास आपल्या अंगभूत कलेची चुणूक दाखवली आहे.

कुंचल्याच्या फटकाऱ्याने हुबेहूब चित्रे रेखाटणाऱ्या सिद्धेश सुर्वेने अमूर्त शैलीत रेखाटलेली विविध व्यक्तिचित्रे, त्याला बालपणसापासून असणारी चित्रविषयी ओढ व कुतूहल यांचे दर्शन घडवितात. विविध आकार, रंग, पोत, त्यातील वैशिष्ट्यमय समन्वय, बोलकी व संवेदनात्मक समरसता यांचा सुंदर मिलाप त्याचा चित्रांमधून आढळतो. मंगलमूर्ती श्रीगणेश, प्रभू येशू ख्रिस्त, राधाकृष्ण, पि.के. चित्रपटाचे पोस्टर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटलेली व्यक्तिचित्रे रसिकांची वाहव्वा मिळवून जातात. सिद्धेशने रेखाटलेले स्वामी समर्थांचे चित्र पहिले कि नकळतपणे रसिकांचे हात जोडले जातात. एवढा जिवंतपणा तो आपल्या चित्रात साकारतो.

 कोकणचा सुपुत्र

मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या असणाऱ्या सिद्धेश सुर्वेला कलाक्षेत्राची बालपणापासून आवड होती. विविध स्तरावर झालेल्या चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत सहभाग घेऊन त्याने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. Drawing कलारंभ, राज्य पर्यटन महोत्सवात प्रथम पारितोषिक, विप्रो – पुणे आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या रांगोळी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत त्याने प्रावीण्यही मिळवले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कलादालनात सिद्धेश च्या चित्रांचा पण सहभाग होता. रांगोळी प्रदर्शनात अल्बर्ट आईन्स्टाईन, मदार तेरेसा, अण्णा हजारे, श्रीनिवास रामानुजन, शिवरामराजे भोसले, बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींची चित्रे रांगोळीतून साकारली आहेत.

कोणताही कलाकार सहजासहजी घडत नाही. सुरवातीपासून आतापर्यंत त्याला कित्येक वेळा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याची झळ त्याने कधी आपल्यातील कलाकाराला पोहोचू दिली नाही.  कलेच्या प्रवासात त्याची गाडी खूप वेळा मार्गदर्शनाअभावी रखडली गेली पण त्याने हार न मानता त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू ठेवले आणि जे मार्गदर्शन पाहिजे ते मिळवले आणि आपल्यातील एक परिपूर्ण कलाकार निर्माण केला.  अर्थांजनासाठी तो सध्या Tech Mahidra  ह्या कंपनी मध्ये मुंबईला नोकरीला आहे. नोकरीतून मिळालेला रिकामा वेळ तो कलेसाठी देतो. रसिकांनी त्याच्या कलेला दाद देऊन पैंटिंग बनवून घेतली आहेत. ह्यासर्वात त्याला खूप चांगल्याप्रकारे त्याच्या पत्नीची साथ मिळते. सौ. सिद्धी सिद्धेश सुर्वे नुसता संसार संभाळत नाही तर त्याला कलेसाठी शक्य होईल तेव्हडी मदत पण करतात.

कोकणच्या ह्या सुपुत्राला गरज आहे आपल्यातील अस्सल रसिकतेची आणि आपल्या पाठबळाची.आम्ही इथे सिद्धेश ने रेखाटली काही पैंटिंग्स आपल्यासाठी देत आहोत. जर कोणी सिद्धेश कडून पैंटिंग्स बनवून घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्याचा मोबाईल नंबर खाली दिला आहे.

 

 

 

 

सिद्धेशच्या लोकप्रिय कलाकृती

 

 

सिद्धेशच्या आजून कलाकृती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/folderview?id=12UomEeBuS37ylIgn1n8kLgUQmPCZny3V

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search