मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह भावनिक आवाहन करूनही शिवसेनेचे अजून ६ आमदार ”Not Reachable” आहेत.
यात शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड, दादर मधील आमदार सदा सरवणकर, कुर्ला विभागातील आमदार मंगेश कुडाळकर, चांदिवली विभागातील आमदार दिलीप लांडे हे सर्व Not Reachable असून सूरत मार्गे गुवाहाटी ला रवाना झाले असे सांगण्यात येत आहे.
मी मुख्यमंत्री पद काय शिवसेना प्रमुख हे पद ही सोडायला तयार आहे असे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक वक्तव्यामुळे आणि त्यानंतर वर्षा बंगला सोडण्याच्या निर्णयामुळे गेलेले आमदार पुन्हा येतील अशी अपेक्षा होती पण शिवसेनेसाठी परिस्थिती खूपच वाईट होत चालली आहे.
आमदार एकनाथ शिंदे आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती नको आहे. पण उद्भव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात त्यांनी ही युती तोडण्याबाबत काही विधान केलेले नाही आहे. उलट काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी आपल्या साठी खूप काही केले त्याचा उल्लेख त्यांनी केला होता.
आता ह्या होणार्या घडामोडी नंतर महाराष्ट्राचे राजकारण कोणते वळण घेते यावर सर्व महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे.