हिंदुत्वाच्या रक्षणासाठी…..बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा. – दीपक केसरकर

शिंदे गटाचे प्रवक्ते शिवसेना आमदार यांनी twitter वर एका पत्राद्वारे आपली आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका मांडली आहे. ते लिहितात……..

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी…..


बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा.


गेल्या ५ दिवसांपासून शिवसेनेचे राजकारण ढवळून निघाले आहे. आम्ही वंदिनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे, शिवसेनेचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर का पडलो, तर घाण ठरलो, डुकरे ठरलो. आमच्याच भरवशावर राज्यसभेत बसलेले रोज विखारी भाषा वापरतात. आता तर त्यांना आमच्या मृतदेहांची आस लागली आहे. कळीचा मुद्द्दा हाच आहे आणि गुवाहाटीत बसून आमचा, शिवसेनेचा आवाज बुलुंद करण्याचे तेच खरे कारण आहे, तीच या सन्मानाच्या लढाईची पार्श्वभूमी आहे. हे बंद नाही तर शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. अर्थात आमच्या नेतृत्वाला हे समजून उमजत नाही, हेही आमचे मोठे दुःख आहेच. आज आम्हाला विकले गेलेले ठरविणारे कोण, केव्हा, कसे आणि कुणाला विकले गेले, हे थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न.

आज जी परिस्थिती उद्भवली आहे त्याची पाळेमुळे जुनी आहेत. शिवसेना आणि भाजपाची युती अतिशय जुनी. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढलो. शिवसेनेची ताकद होतीच, पण सोबतच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या परिश्रमामुळे शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रित लढवायचे ठरवले होते. त्यावेळी युवानेते आदित्यजी ठाकरे यांनी +१५१ ची घोषणा दिली होती. अशात भाजपने १४० जागांचा प्रस्ताव दिला होता. पण वाटाघाटींनंतर भाजपने १२७ जागा घायचा आणि शिवसेनेला १४७ जागा द्यायच्या यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेची ताकद होतीच पण ४ जागांचा आग्रह सोडला गेला नाही. शेवटी जे व्हायला नको तेच झाले. दीर्घकाळाची युती तुटली आणि आम्हाला वेगवेगळ्या निवडणुका लढवाव्या लागल्या. येथे एक बाब आर्वजून नमूद केली पाहिजे कि, २०१४ ची निवडणूक असो कि, २०१९ नंतर राज्यात उद्भवलेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत कि भाजपचे केंद्रीय अथवा अगदी राज्यस्तरावरील नेते अगदी कुणीही आमचे आदर्श वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही.

पुढे काही दिवसातच शिवसेना आणि भाजप पुन्हा सोबत आली. केंद्रात आमचेही मंत्री झाले. पण, हाच तो कालखंड होता, जेहवापासून संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपच्या सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम चालू केला. म्हणजे केंद्रात मंत्रीपदे घ्यायची, मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचे आणि मोदींवर जहरी टीका सुद्धा करायची, यातून दोन्ही पक्षातील दरी वाढवण्याच्या कामाला पद्धतशीर रित्या सुरवात झाली. याही काळात आम्ही वेळोवेळी पक्ष नेतृत्वाला या बाबी लक्षात आणून देण्याचे काम करीत होतो. पण, त्याचा काही परिणाम होत नव्हता.  दररोज अतिशय घाणेरड्या शब्दात टीका होतच राहायची. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरात नाही ती भाषा आमच्या संजय राऊतांच्या तोंडात कायम असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा तर वाढतच होती पण शिवसेना सुद्धा आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीतच होती. या वाटचालीत हिंदुत्वाचा विचार अजून भक्कम होत होता, याचा आम्हाला अधिक आनंद होता. शेवटी युती, आघाड्या यापेक्षाही आपला आक्रमक हिंदुत्व बाणा, हि बाळासाहेबांची पहिली आणि अंतिम शिकवण आहि आणि यापुढीचे तीच आजन्म राहील. आमचा जन्म असो कि मृत्य हिंदुत्वाची चादर पांघरूनच होईल.

हळूहळू शिवसेनेच्या राजकारणाने प्राप्त करणे प्रारंभ केले होते. राजकारणाची दिशा बदलत होती. हे राजकारण शिवसेनेच्या वाढीसाठी आणि हिंदुत्वाच्या वाढीसाठी अनुकूल असते तर ते किमान समजूनही घेता आले असते. हे सत्तेचे राजकारण असते तर एकवेळ तेही समजून घेतले असते. पण, सत्ता कशाच्या बळावर तर स्वतःला संपवून? हे आम्हाला कदापिही मान्य नाही. शिवसेनेचे अस्तित्व राहणार नसेल तर मिळणारी पदे आणि सत्ता काय कामाची?

आमचा लढा सत्तेसाठी नाही, सत्तेत तर आम्ही होतोच. पण संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष जर शरद पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तिव काय उरेल.

ज्या काश्मीरच्या प्रश्नावर वंदनीय हिंदुह्रिदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली, नव्हे काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात निमंत्रण दिले, त्या कलम ३७० च्यावेळी उघडपणे आमच्या नेत्यांना बोलता येऊ नये, इतकी वाईट अवस्था? सोनिया गांधी आणि शरद पवाय यांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का? सर्व महत्वाची खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्री पद  तेवढे ठेवायचे. दाऊदशी संबध असल्याचा आरोप असलेल्या नेत्याचा बचाव करायचा तरी कसा? राज्यसभा निवडणुकांतही या पक्षांनी शिवसेनेच्या उमेदवारांना हरवायचे. मग करायचे तरी काय? नुसते सहन करीत बसायचे?

दुर्दैव म्हणजे जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपापासून तुम्ही कदाचित शिवसेनेला दूर नेऊ शकाल., पण हिंदुत्वापासून शिवसेना दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे?आणि दुर्दैव म्हणजे याच संजय राऊतांचे ऐकुन पक्ष चालणार असेल तर आणि आमच्या सारख्या अनेकदा निवडून आलेल्या आमदारांना दूर ढकलण्यात येत असेल तर करायचे तरी काय? उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढविण्याचे काम संजय राऊतांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, त्यासाठी खांदा संजय राऊतांचा खांदा वापरायचा आणि त्यातून मारले जाणारे कोण तर पक्षाचे शत्रू नाही तर आपणच. आम्हाला हे मान्य नाही म्हणुन आमचा हा लढा हा शिवसेनेचा आहे, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे, शिवसेनेच्या अस्तित्वाचा तसेच मराठी आणि हिंदू संस्कृतीच्या अस्मितेचा आहे. हे बंड नाही हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही. म्हणुन महाराष्ट्राच्या सदिच्छांचे आणि आशिर्वादाचे बळ आम्हाला लाभते आहे. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. शिवसेनेचे आणि आमचे पक्षनेते उद्धव साहेबांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा आणि विद्यमान आघाडी सोडून भाजपसोबत युती करावी. महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेल्या युतीचे पुनर्जीवन करावे.

आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, महाराष्ट्राला पुन्हा नवीन उंचीवर नेऊन ठेवल्याशिवाय आता माघार नाही. जय महाराष्ट्र

दीपक केसरकर

 

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा

.

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search