हल्लीच घडलेल्या गैरप्रकारांनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी आंबोलीत गर्दीच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी म्हणजे वीकएंडला पोलीस बंदोबस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात काही मद्यधुंध तरुणांनी हुल्लडबाजी करून वाहतुकीस अडथळा आणला होता. तसेच बेळगावच्या एका तरुणाने सावंतवाडी आगाराच्या ST चालकाला गाडीतून ओढून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. हे अनुचित प्रकार टाळण्यासाठी इथला बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.
आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलिसांची बैठक घेण्यात आली होती त्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता, तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने काही निर्णय घेण्यात आले.
मुख्य धबधब्याच्या ठिकाणी गाड्या योग्य नियोजनाअभावी पार्क केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून पार्किंगसंबधी नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. वाहने पार्क करण्यासाठी आंबोली येथील सात पर्यटन स्थळावर पार्किंगसाठी जागा लवकरच निश्चित केली जाईल. त्यानंतर वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणण्यात येईल.
Facebook Comments Box