मुंबई : अखेर राज्यपालांनी आपल्या त्या वादग्रस्त विधानावर माफी मागितली.आज त्यांनी प्रत्यक्ष आणि ट्विटर च्या माध्यमातून माफी मागितली. ट्विटर वर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत त्यांनी आपला माफीनामा आज प्रसिद्ध केला.
ते म्हणाले :
दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एक सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासातील काही समाजबांधवाच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकसत सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. खासकरून संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास ३ वर्षात मला ह्या राज्यातील लोकांकडून अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल हि कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता ह्या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभिय...
महाराष्ट्र
फक्त २००० रुपयांत, तासाभरात कोकणात, पुणेकर चाकरमान्यांना अखेर मिळाला प्रवासाचा जलद पर्याय
महाराष्ट्र
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल होणार, पर्यावरणविषयक परवानगीसाठी पाठविलेला प्रस्ता...
महाराष्ट्र
Vision Abroad