प्रलंबित राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या करण्याचे निश्चित झाले असून त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचे समजते.
मुख्यमंत्र्याच्या ”नंदनवन” ह्या निवासस्थानी ह्या बाबत सुमारे 1 तास 45 मिनिटे ही बैठक संपन्न पडली आहे. विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राजभवनातील दरबार हे सभागृह उद्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
उद्या पाहिल्या टप्प्यात सुमारे 17 ते 18 आमदारांचा शपथविधी होणार आहे. ह्या टप्प्यात महत्त्वाच्या खात्याचे वाटप होणार असून शिवसेनेच्या 6 ते 7 शिवसेनेचे मंत्री आणि 10 ते 11 भाजपचे मंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे.
ह्या बैठकीत ह्या नावांवर शिक्कामोर्तब झाली असून नक्की कोणा कोणाची वर्णी लागणार हे अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आलेले नाही आहे. तरीपण शिंदे गटातील आधीच्या सरकारातील मंत्री असलेले आमदारांना उद्या मंत्री पदे भेटतील असे सांगण्यात येत आहे. भाजपने मंत्री वाटप करताना प्रादेशिक समतोल साधेल ह्याची दक्षता घेतली आहे असे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि रविन्द्र चव्हाण यांची नावे नक्की केली गेली आहेत.
खात्यांबाबत बोलायचे म्हंटले तर महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ आणि गृह खाते भाजपकडे जाणार आहे. महसूल खात्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांच्या गटाला ते भेटले की नाही हे आजून समजले नाही आहे. उच्चशिक्षण, जलसंपदा ही खाती पण भाजपा कडे तर पाणीपुरवठा आणि कृषी ही खाती एकनाथ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कडे ठेवतील आणि अर्थमंत्री पदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे असे सांगितले जात आहे.
आज रात्री उशिरापर्यंत ही सर्व नाही जाहीर करण्यात येतील अशी शक्यता आहे.