शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पहिला टप्पा पार पाडला आहे,त्यात शिंदे गटातील 9 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. पण ह्या वाटपावरून शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याचे पहावयास मिळाले. काहीजणांनी तर आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली तर काहीजणांनी ती आपल्या कृतीमधून दाखवून दिली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढविणारी एक घटना समोर आली आहे.
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केली होती त्यामध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक विडिओ पोस्ट करून ‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब…’ असे ट्विट केले आहे.
त्यांच्या ह्यांच्या ट्विट मुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे. मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने ते पुन्हा शिवसेनेत जाणार आहेत अशा चर्चा होवू लागल्या आहेत.
दरम्यान, ह्यासंबधी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते त्यांनी सारवासारवीची उत्तरे दिल्याचेही समजते. आधी ते म्हणाले की माननीय उद्धव ठाकरे यांचे स्थान हे आमच्यासाठी कुटुंबप्रमुखाचेच आहे असे समजते. ह्या ट्विटचा वेगळा अर्थ घेवू नये असे ते म्हणाले. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी ही ट्विट डिलीट केली आणि आपल्याकडून ही ट्विट चुकून पोस्ट झाली असे ते म्हणाले. आपला राजकारणातील 38 वर्षाचा अनुभव आणि मताधिक्य पाहता मला मंत्रिपद मिळायला हवे होते. तसा शब्दही दिला गेला होता असे बोलून त्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली.
Vision Abroad