आज सकाळी झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अपघातानंतर त्यांना एक तास मदत मिळाली नाही. वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता.
त्याच गाडीत त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितले की अपघात झाल्यावर विनायक मेटे हे त्यांच्याशी बोलले होते. आम्ही तिथून जाणार्या वाहनांना हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कोणी गाडी थांबवली नाही. एवढेच नव्हे तर अक्षरशः रस्त्यावरून झोपून पण त्यांनी मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केला.
ह्याबरोबरच 100 ह्या emergency नंबर वर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिथून पण त्यांना मदत मिळाली नाही. अनेकदा फोन करून पण तिथून फोन उचलला गेला नाही.
शेवटी एका वाहनचालकाने गाडी थांबवली. आणि एका तासाने मदत मिळाली. ताबडतोब मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते असे त्यांचे सहकारी म्हणाले.
हे सर्व खूपच निंदनीय म्हणावे लागेल. राज्याचा राजकारणातील एका मोठ्या नेत्याला असे अनुभव आलेत तर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Vision Abroad