फाळणी दु:खद स्मृतीदिनानिमित्‍त प्रदर्शन फाळणीचा इतिहास, वेदना प्रदर्शनातून समजून घ्‍या – जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : देशाची फाळणी ही दु:खद करणारी गोष्‍ट आहे. या फाळणीमुळे स्‍थलांतरण प्राण गमावलेल्‍या आणि विस्‍थापनामुळे अनंत वेदना सहन केलेल्‍या भारतवासियांचे स्‍मरण करु या आणि त्‍यांना श्रध्‍दांजली वाहू या अशा शब्‍दात जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी श्रध्‍दांजली वाहिली.

14 ऑगस्‍ट 2022 या फाळणी दु:खद स्‍मृती दिनानिमित्‍त जिल्‍हा नियोजन समितीच्‍या सभागृहात प्रदर्शन भरविण्‍यात आले. यानिमित्‍त झालेल्‍या कार्यक्रमास मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्‍तात्रय भडकवाड, जिल्‍हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्‍हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, प्रशांत पानवेकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नायर, पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनी या चित्रप्रदर्शनाची सुरुवातीला पाहणी केली. यानंतर जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी म्‍हणाल्‍या, फाळणीवर आधारित अनेक चित्रपट आणि पुस्‍तकांची निर्मिती झालेली आहे. ही चित्रपट पाहिल्‍यानंतर आणि पुस्‍तक वाचल्‍यानंतर फाळणीमध्‍ये भारतवासियांना त्‍यावेळचा क्‍लेष कसा होता, त्‍यांनी काय भोगलय हे आपल्‍याला समजून येते. फाळणीचा इतिहास सर्वांनी विशेषत: विद्यार्थ्‍यांनी समजून घ्‍यावा. यानिमित्‍ताने वेदना भोगलेल्‍या प्राण गमावलेल्‍या भारतवासियांचे स्‍मरण करु आणि श्रध्‍दांजली वाहू. मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नायर आणि पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनीही या वेळी श्रध्‍दांजली वाहिली. प्रास्‍ताविकात निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री. भडकवाड यांनी फाळणीबाबत माहिती दिली. फाळणीच्‍या दरम्‍यान मोठ्या प्रमाणात दंगली झाल्‍या. लाखो लोकांचे स्‍थलांतरण झाले अनेक लोक मृत्‍यू पडले कित्‍येक जखमी झाले कित्‍येकांचे कुपोषणामुळे बळी गेले. रेल्‍वे रुळावर अनेकांचे बळी गेले. अनेकांच्‍या संपत्‍तीच्‍या अतोनात नुकसान झाले. विस्‍थापनामुळे अनंत वेदना सहन केलेल्‍या भारतवासियांना त्‍यांनी श्रध्‍दांजली वाहिली. 

Source and Credit – diosindhudurg

https://twitter.com/InfoSindhudurg/status/1558726438823804928?t=8uPrFSGlPll3lTpEr0n6fQ&s=19

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search