आजपासूनमहाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नमस्कार न म्हणता वंदे मातरमने फोनवर संभाषण सुरू करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
आज मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नाव सांस्कृतिक खात्यासाठी जाहीर केल्यानंतर त्यांनी हि एक महत्वाची घोषणा केली आहे. शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. 18 व्या शतकामध्ये दुरध्वनीच्या माध्यमातून सुरूवात हॅलो म्हणून व्हायची. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. हे अभियान ते १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी पर्यंत राबवली जाणार आहे. ह्यासंबंधीचा अधिकृत जीआर ते लवकरच काढणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
शिंदे सरकारमधील खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे.