अपेक्षित खाती न मिळाल्याने शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची चर्चा आता चालू झाली आहे. दीपक केसरकर, दादा भुसे आणि संदीपान भुमरे त्यांना मिळालेल्या खात्यांबाबत नाराज असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
पुन्हा जुनेच खाते मिळाल्याने संदीपान भुमरे नाराज असल्याचे समजते. दीपक केसरकर यांना पर्यटन व पर्यावरण खाते मिळण्याची अपेक्षा होती, तसे त्यांनी बोलून पण दाखवले होते. पण त्यांना शालेय शिक्षण खात्याची धुरा दिल्याने ते पण नाराज असल्याचे समजते. कोकणसाठी पर्यटन खाते महत्वाचे होते, त्याद्वारे कोकणातील पर्यटनाचा विकास मला करता आला असता असे ते म्हणाले.
प्रकृतीच्या कारणावरून आपण आताच्या मुख्यमंत्र्यांना आणि आधीच्या सरकारातील मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेकरवी ज्या खात्याची मागणी केली होती ती त्यांची मागणी मान्य न करता त्यांना बंदरे व खनिकर्म हे खाते देण्यात आले असल्याने ते नाराज असल्याचे समजते.
ह्याआधी मंत्रीपदे न मिळाल्याने शिंदे गटात काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता जे मंत्री झाले आहेत त्यांना अपेक्षित खाती न भेटल्याने त्या मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांची नाराजी एकनाथ शिंदे कशी हाताळतात हे आता पुढील काळच सांगेल.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभिय...
महाराष्ट्र
कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करावी या मागणीसाठी अखंड ...
महाराष्ट्र
मुंबई परिवहन मंत्र्यांचा कर्नाटक दौरा; महाराष्ट्रात कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न राबविण्याची शक्यत...
महाराष्ट्र