मुंबई :दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शिंदे सरकारने आज घेतला आहे. सरकारने त्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. आर्थिक सहाय्य फक्त ह्या वर्षासाठी मर्यादित असेल पुढील वर्षी गोविंदा पथकांच्या विम्या बाबत सरकार निर्णय घेईल असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.
जर एखादी दुर्दैवी घटना घडल्यास खालील परिस्तिथीमध्ये गोविंदांना आर्थिक साहाय्य दिले जाईल
गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.
दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
Facebook Comments Box
Vision Abroad