कोकणात गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी खुशखबर. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येतील. ह्या गाड्या आधी 12 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले होते. आता त्यात अतिरिक्त 5 डबे वाढवून त्या आता 17 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहेत. AC Two Tier 2 डबे + AC Three Tier 2 डबे + AC Chair Car 1 डबा असे एकूण 5 अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
1) Lokmanya Tilak T – Madgaon Weekly Express. 11099
ही गाडी 27.08.2022 आणि 10.09.2022 ह्या दिवशी (शनिवार) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
2) Madgaon – Lokmanya Tilak T Weekly Express. 11100
ही गाडी 28.08.2022 आणि 11.09.2022 ह्या दिवशी (रविवार) मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
1) Lokmanya Tilak T – Madgaon Bi-Weekly Express. 11085
ही गाडी 29.08.2022 आणि 07.09.2022 ह्या दिवशी (सोमवार, बुधवार) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
2) Madgaon – Lokmanya Tilak T Weekly Express. 11086
ही गाडी 30.08.2022 आणि 08.09.2022 ह्या दिवशी (मंगळवार, गुरुवार) मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
Related News गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या अजून विशेष गाड्या…आरक्षण २५ ऑगस्ट पासून
Vision Abroad