आज दिनांक 15.09.2022 पासून मुंबई ते करमाळी दरम्यान चालविण्यात येणारी तेजस एक्सप्रेस एका विस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोच सोबत धावणारी कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी गाडी ठरली आहे. ह्या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान रोज चालविण्यात येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस या कोच सह चालविण्यात येत होती. विस्टाडोम कोच साठी प्रवाशांच्या प्रतिसादामुळे हा डबा तेजस एक्सप्रेसला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या गाडीतील विस्टाडोममध्ये एका डब्यात 40 प्रवासी असणार आहेत.
गाडीचा मडगाव जंक्शन पर्यंत विस्तार
तसेच ही गाडी मडगाव जंक्शन पर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून करमाळी ऐवजी मडगाव पर्यंत धावणार आहे. तर ही ट्रेन दर मंगळावार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. मडगावहून मुंबईला देखील ही ट्रेन याच दिवशी परत येणार आहे.
कसा असतो विस्टाडोम कोच?
विस्टाडोम हा प्रशस्त आणि खास डब्बा असतो. वातानुकुलित असणार्या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. काचेच्या प्रशस्त खिडक्या आणि छत आहे ज्यामुळे डोंगरदर्यांचे विहंगम दृश्य टिपता येते.
Facebook Comments Box
Vision Abroad