मुंबई – आता जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई च्या ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) विभागाने आपली विशेष टीम सक्रिय केली आहे. ही विशेष टीम ह्या झोनच्या महत्त्वाच्या भागांत गस्त घालणार आहे. तसेच एक नियंत्रण विभाग बनविण्यात आला आहे. ह्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी एक हॉटलाइन नंबर जारी करण्यात आला आहे, तसेच whatsapp चाटद्वारे आणि ईमेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कशी कराल तक्रार?
एखादा टॅक्सी ड्रायवर जवळचे भाडे नाकारत असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
9076201010 ह्या नंबर वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता. ह्या वेळा व्यतिरिक्त जर तक्रार करायची असेल तर whatsapp चाट, टेक्स्ट मेसेज द्वारे किंवा ईमेल द्वारे आपली तक्रार नोंदविता येईल. त्यासाठी [email protected] हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. अशा तक्रारी इंस्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याकडून हाताळल्या जातील.
ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी या उपक्रमामुळे नक्किच टॅक्सी चालकांच्या मनमानीवर आळा बसेल. जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार मुंबईत सर्रास घडत आहेत. अगदी अर्जंट जायचे आहे अशी गयावया करूनही टॅक्सी चालक तयार होत नव्हते.
या प्रकारचा उपक्रम मुंबईच्या इतर विभागात राबविण्यात यावा अशी अपेक्षा आहे.
Facebook Comments Box