देवगड – मालवण – वेंगुर्ला रेल्वेमार्ग लवकरात लवकर अस्तित्वात यावा ह्यासाठी केंदीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ह्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
127 किलोमीटर च्या ह्या रेल्वे मार्गासाठी नारायण यांनी पुढाकार घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे किनारे ह्या मार्गा मुळे जोडले जाणार आहेत. कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड मालवण वेंगुर्ला असा हा रेल्वे मार्ग असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनार पट्टीत सध्या रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी हा रेल्वे मार्ग महत्वाचा वाटा उचलेल हे नक्की. ह्या मार्गावर टुरिस्ट ट्रेन किंवा माथेरान, सिमला येथे चालविण्यात येणाऱ्या ट्रेन सारख्या गाड्या चालू करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात त्यांनी केंदीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 2021 साली एक पत्र लिहिले होते. ह्या प्रस्तावित ‘टॉय ट्रेन’ च्या मार्गाचा एक प्राथमिक सर्वे पण करण्यात आला होता.
Facebook Comments Box