मुंबई : पालिकेच्या भायखळा ‘ई’ विभागाने लालबाग गणेशोत्सव मंडळाला ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. मंडळाने गणेशभक्तांसाठी दर्शनाच्या रांगांसाठी बॅरिकेड्स उभारताना रस्त्यावर खड्डे पाडल्यामुळे मंडळाने रस्त्यावर १८३ खड्डे खोदल्याने त्याची भरपाई म्हणून हा दंड आकारला गेला आहे.
महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा दंड मंडळाच्या महापालिके कडे जमा असलेल्या निधीतून वसूल केला जातो.
भायखळा ‘ई’ विभागाच्या हद्दीमधील टी. बी. कदम मार्गावर (दत्ताराम लाड मार्ग जंक्शन ते नेकजात मराठा बिल्डिंगपर्यंत) पालिकेची परवानगी न घेता दर्शन रांगेसाठी मार्गिका उभारण्यात आली. या मार्गिकेला बॅरिकेड्स लावण्यासाठी खड्डे पाडण्यात आले. पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार रुपये याप्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. ही रक्कम ‘ई’ विभाग कार्यालयात तातडीने भरण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आले आहेत.
या पूर्वीपण अशा प्रकारचा दंड महापालिकेकडून
आकारला गेला होता. सन 2012 साली 23.56 लाख, 2013 साली 5.60 लाख, 2014 साली 5.56 लाख तर 2015 ह्या वर्षी 3.36 लाख ह्या कारणास्तव मंडळातून दंड वसूल करण्यात आला होता.
Vision Abroad