मुंबई :भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपमुळे आतापर्यंत गांबिया नावाच्या देशात 66 कोवळ्या जिवांच्या मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या या कफ सिरप बद्दल पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय.
या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सिरपचं वितरण गांबियासोबत इतरही अनेक देशात झालेलं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण चार सिरप बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.
कोणती आहेत ही सिरप
प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.
संशयास्पद चार सिरपमुळे पोटदुखी, उलट्या होणं, लघवीला न होणं, डोकेदुखी, कीडनीचे विकार बळावणं, अशी लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे या सर्व उत्पादनांची तातडीने सखोल चौकशी आणि तपास केला जाईल. तोपर्यंत हे सर्व कफ सिरप असुरक्षित मानले जातील, असं WHO ने म्हटलं आहे.
Vision Abroad