मुंबई :अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून वाघ किंवा वाघाचा चेहरा हे चिन्ह निशाणी म्हणून निवडणूक आयोगाकडे मागण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणं हे चिन्ह फ्रिज केलं अंधेरीच्या पोट निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे.
वाघ ह्या चिन्हासाठी शिवसेना का आग्रही?
धनुष्यबाण हे जरी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असले तरी वाघाचा चेहरा आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक जाहिरातीत, बॅनर वर राहिला आहे. त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेचे नवीन निवडणूक चिन्ह झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो.
निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नाही
निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसल्याची माहिती मिळत आहे. निवडणुक आयोगाकडे हत्ती किंवा सिंह ही चिन्हे उपलब्ध आहे, त्यामुळे शिवसेनेला वाघ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

Vision Abroad
