Ratnagiri News :कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. गेली पाच वर्षे राखलेल्या ह्या कामाच्या भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
ह्या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. ह्या कामासाठी 2 हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. एकूण 134 कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता 667.13 हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्वी शहरातून जात होता. आता केर्ली बायपास काढण्यात आला आहे. केर्ली-शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
हेही वाचा : ‘जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समिती’ची येत्या रविवारी सभा.
या गावांतून जाणार महामार्ग…
शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळेवडे, केर्ले, चांदोली, चनवाड, वारूळ, वालूर, निळे, करुंगळे, येलूर, जाधववाडी, कडवे, पेरिड, भैरेवाडी, कोपार्डे, ससेगाव, करंजोशी, सावे, गोगवे, बांबवडे, वाडीचरण, चरण, डोणोली, खुटाळवाडी; पन्हाळा तालुक्यातील आवळी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, अंबवडे, पिंपळे-सुर्वे, दानेवाडी, कुशिरे; करवीर तालुक्यातील केर्ले, पडवळवाडी, केर्ली, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये; तर हातकणंगले तालुक्यातील टोप, नागाव, वडगाव, हेर्ले, माले आणि चोकाक.