पर्यटन संचालनालयामार्फत महाड येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क सहलीचे आयोजन

   Follow us on        
konkan Tourism News :पर्यटन संचालनालयामार्फत “टूरसर्किट द्वारे” दि.3 व 4 तसेच 7 व 8 डिसेंबर, 2022 या कालावधीत कोकणातल्या महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क एकदिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन, नवी मुंबई या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर वर नमूद तारखांना सोडण्यात येतील.
या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य” या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्विकारण्यात येणार आहे. 
दि.3 व 4 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.1 डिसेंबर,22 पर्यंत व दि.7 व 8 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.5 डिसेंबर,22 पर्यंत करणे अनिवार्य आहे. आगाऊ आरक्षण आणि अधिक माहितीसाठी 9930359384/9421051708 या क्रमांकांवर तसेच [email protected] या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search