दुपारी दादर येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
KONKAN RAILWAY NEWS:रत्नागिरी ते मडगाव ह्या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी ह्या दोन गाड्या तात्पुरत्या काळापुरती रद्द केल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
ह्या आधी एका दिनांक 22/10/2022 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे ह्या गाड्या दिनांक 31/12/2022 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत दिनांक 31/03/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी हि गाडी रद्द ठेवण्यात येणार आहे असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे.
दुपारी येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad