मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर…दौरा कार्यक्रम असा असेल

रत्नागिरी  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या शुक्रवार दि. 16 डिसेंबर रोजी रत्नागिरी दौर्‍यावर येत असून, या दिवशी रत्नागिरी मतदार संघात तब्बल पाचशे कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर बहुचर्चित तारांगणाचे उद्घाटनही मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार 16 डिसेंबर 2022

सकाळी 10.00  – राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.

सकाळी 11.00  – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने मारुती मंदीर रत्नागिरीकडे प्रयाण.

सकाळी 11.30 – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण व अभिवादन.(स्थळ : मारुती मंदीर, रत्नागिरी)

सकाळी 11.40  – मोटारीने श्री देव भैरीबुवा मंदिर, रत्नागिरीकडे प्रयाण.

सकाळी 11.45 – रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा मंदीर येथे आगमन व दर्शन.

सकाळी 11.55 – मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.

दुपारी 12.00  – रत्नागिरी जिल्हयातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी01.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.

दुपारी 01.30 ते 02.45 – शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 02.45 ते 03.30 वाजता विविध संघटनांच्या शिष्टमंडळास भेट –

१) भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा.

२) रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन (8 प्रतिनिधी)

३) एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटना (8 प्रतिनिधी )

४) शिक्षक संघटना ( 8प्रतिनिधी)

५) मच्छिमार संघटना (8 प्रतिनिधी)

६) आंबा बागायतदार संघटना ( 8 प्रतिनिधी)

७) जिल्हा परिषद (5 प्रतिनिधी) व महसूल (5 प्रतिनिधी) अधिकारी /कर्मचारी संघटना.

(स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी).

दुपारी 03.30  – मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.

दुपारी 03.45 ते 04.45 – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी).

सांयकाळी 04.45 – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी येथून माळनाका रत्नागिरी कडे प्रयाण.

सांयकाळी 05.00 ते 05.15 – श्रीमान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : माळनाका, रत्नागिरी) सांयकाळी 05.15 वाजता माळनाका, रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 05.20 ते 05.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.

सांयकाळी 05.45  ते 07.00 – जाहिर सभेत उपस्थिती. (स्व. प्रमोद महाजन क्रिडा संकुल, रत्नागिरी).

सांयकाळी 07.00 – रत्नागिरी येथून मोटारीने पाली, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

सांयकाळी 07.30 ते 08.30 – उदय सामंत, मंत्री उद्योग यांचे पाली येथील निवासस्थानी आगमन व राखीव.

रात्रौ 08.30  – वाजता पाली, जि. रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्रौ 10.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search