Konkan Railway News : ख्रिसमस सण आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याला भेट देणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, तसेच नाताळाच्या सुट्टीत हिवाळी पर्यटनासाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे प्रशासनाने काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 01445 / 01446 Pune Jn. – Karmali – Pune Jn. Special (Weekly)
ह्या गाड्या पुणे जंक्शन ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01445
ही गाडी दिनांक 16/12/2022 ते 13/01/2023 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी पुणे जंक्शन ह्या स्टेशनवरुन संध्याकाळी 17.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train No 01446
ही गाडी दिनांक 18/12/2022 ते 15/01/2023 पर्यंत प्रत्येक रविवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 23.35 वाजता पुणे जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे थांबे
लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 04+ टू टायर एसी – 01 +असे मिळून एकूण 22 डबे
(Also Read : कोंकणरेल्वेच्या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल…ह्या गाड्यांचे जनरल डबे कमी केलेत… )
2) Train no. 01448 / 01447 Karmali – Panvel- Karmali Special (Weekly)
ह्या गाड्या पनवेल जंक्शन ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01448
ही गाडी दिनांक 17/12/2022 ते 14/01/2023 पर्यंत प्रत्येक शनिवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20.15 वाजता पनवेल जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01447
ही गाडी दिनांक 17/12/2022 ते 14/01/2023 पर्यंत प्रत्येक शनिवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी पनवेल जंक्शन या स्थानकावरून रात्री 22.00 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 08.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे थांबे
रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 04+ टू टायर एसी – 01 +असे मिळून एकूण 22 डबे
(Also Read: पनवेल नांदेड एक्सप्रेस चिपळूणपर्यंत विस्तारित करण्याची मागणी.)
3) Train no. 01459 / 01460 Lokmanya Tilak (T) Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Bi-Weekly)
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी स्थानका दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01459
ही गाडी दिनांक 19/12/2022 ते 11/01/2023 पर्यंत प्रत्येक सोमवार आणि बुधवार या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या स्टेशनवरुन रात्री 20.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01460
ही गाडी दिनांक 20/12/2022 ते 12/01/2023 पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि गुरुवार या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी ह्या स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसलआर – 02 + थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03 + फर्स्ट एसी – 01 असे मिळून एकूण LHB 21 डबे
Vision Abroad