रत्नागिरी: शासनाने 5 फेब्रुवारी 2016 च्या अधिसुचनेनुसार 1 जानेवारी पासून पर्ससीन मासेमारी बंद केली आहे. त्यामुळे आजपासून हि मासेमारी ऑगस्ट महिन्याच्या अखेपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्र सागरी अधिनियमन 1981 अंतर्गत पर्ससीन मासेमारीच्या अनुषंगाने शासनाने 5 फेब्रुवारी 2016 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील महत्त्वाच्या तरतुदनुसार परवानाधारक पर्ससीन नौकांना सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अधिसूचनेत नमूद केलेल्या क्षेत्रात व विहित जाळ्यांच्या आकाराचा वापर करून मासेमारी करता येईल.
1 जानेवारी ते 31 ऑगस्टया कालावधीत नौका पर्ससीन जाळ्या ने मासेमारी करताना आढळल्यास मत्स्यव्यवसाय विभागामार्फत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 (3) महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन सुधारणा अध्यादेश 2021 मधील कलम 17 पो टकलम [5] जो कोणी पर्ससीन किंवा रिंगरिंसीन किंवा मोठ्या आसाचे ट्रॉल जाळे यांच्या विनियमनाशी संबंधित असणा ऱ्या आदेशा चे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी 1 लाख रुपयांचा दंड, दुसऱ्या वेळी सापडल्यास 3 लाख रुपये दंड आणि तिसऱ्या वेळी मासेमारी करताना सापडल्या स 6 ला ख रुपये दंड आकारला जाणार आहे.तसेच संबधीत नौका मूळ बंदरात किंवा अंमलबजावणी अधिकारीविहित करतील अशा बंदरात जप्तकरून ठेवण्यात येईल व अभिनिर्णय अधिकाऱ्यां कडे दावा दाखल करण्यात येईल.
ह्या बंदीचा मोठा फटका मासेमारी व्यावसायिकांवर आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर स्थानिक लोकांवर बसतो. उर्वरित ८ महिने नौका किनाऱ्यावर न वापरता ठेवल्याने खूप मोठा आर्थिक फटका मासेमारी व्यावसायिकांना बसत आहे.