पूर्वी आपल्या देशाच्या पुरुषप्रधान संस्कृतीत काही व्यावसाय असे होते की तो व्यवसाय एक महिला करणार आहे असे म्हंटले तर असे बोलणार्याची गणती मूर्खात होत असे. त्यातला एक व्यवसाय म्हणजे रिक्षा चालवणे. आता विचार बदललेत, पुरुषांनी व्यापित या व्यवसायात महिलांनी प्रवेश केला आहे. अशी क्रांती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण पाहावयास मिळाली आहे.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका गावातील तरुणी उपजीविकेचे साधन म्हणून रिक्षा चालवत आहे . वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील राऊळवाडी येथील कुमारी हेमलता रवींद्र राऊळ असे त्या तरुणीचे नाव आहे. रिक्षा चालवणारी ती जिल्ह्यातील दुसरी महिला ठरली आहे तर वेंगुर्ले तालुक्यातील पहिली महिला ठरली आहे. ह्या आधी कुडाळ तालुक्यातील मनीषा दामले यांनी १९९० ह्या वर्षी जिल्ह्यातील पहिली रिक्षाचालक होण्याचा मान मिळवला होता.
2 वर्षापुर्वी बारावीचे शिक्षण पूर्ण केलेली हेमलता आता आपल्या भागात रिक्षा चालवत आहे. तिला ही रिक्षा ‘अनाम प्रेम’ ह्या संस्थेच्या वतीने एका योजनेतून देण्यात आली आहे. त्यासाठी माऊली महिला मंडळ,शिरोडा या संस्थेकडून वाहतुक परमिट आणि परवाना मिळवण्यासाठी मदत करण्यात आली आहे. खास करून गायकवाड मॅडम कडून आपणास ह्यासाठी खूप मदत मिळाली असे हेमलता आवर्जून सांगते.हेमलताच्या आईवडिलांनी हेमलताला रिक्षा चालण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
(Also Read >विविध शासकीय योजनांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर… नावे पाहण्यासाठी ही बातमी वाचा..)
मला पोलीस किंवा सैन्य दलात जायची इच्छा आहे, त्यादृष्टीने माझे प्रयत्न चालू होते, त्याचबरोबर रिकामे राहण्यापेक्षा काहितरी करावे हा विचार करून मी नोकरीच्या पर्यायांपेक्षा रिक्षा चालवणे हा पर्याय निवडला. माझा आदर्श घेऊन जिल्हय़ातील ईतर मुलींनी पण ह्या व्यवसायात उतरावे अशी माझी इच्छा आहे असे हेमलताचे म्हणणे आहे.
(Also Read>सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार)
Vision Abroad