भर उतारावर गाडी, अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात येते. डाव्याबाजूला दरी तर उजव्याबाजूला घळण. मोठा अपघात टाळण्यासाठी निर्णय घेण्यासाठी काही क्षणांचाच अवधी. चालकाने या कठीण समयी प्रसंगावधान राखून आपल्या जिवाची पर्वा न करता उजव्या बाजूला असलेल्या घळणीला गाडी आढळून थांबवली आणि मोठा अपघात टळला!
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : दि 26 जानेवारी रोजी सकाळी भोगवे वरून कुडाळला जाणाऱ्या एसटी बसला सकाळी 10:40 वाजण्याच्या सुमारास वालावल येथील उतार असलेल्या मार्गावरून जाताना अपघात झाला. एका बाजुला दरी तर दुसऱ्या बाजूला घळण आणि तीव्र उतार असलेल्या या मार्गावर ही बस थांबविणे गरजेचे होते. प्रसंगावधान राखून चालक तुषार गंवडे यांनी एका घळणीला बस आदळली व बस थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात गवंडे यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व जखमींवरमीं वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याबाबत एसटी बसचे वाहक हरीष करलकर यांनी निवती पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. या बसमध्ये ८ प्रवासी प्रवास करत होते.
(Also Read > मालवणात पहाटे आगीचा थरार.. २ दुकाने जळून खाक..)
सदरच्या अपघाताचे वृत्त समजतात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर राणे यांनी भेट दिली. तर पोलीस एस. बी. नाईक अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad