सिंधुदुर्ग:कणकवली तालुक्यातील सावडाव येथे आज एक धक्कादायक प्रकार घडला. सावडाव येथील ६ मुलांचे जवळ जवळ अपहरण झाले होते. सुदैवाने मुलांनी दाखविलेल्या हुशारीमुळे आणि प्रसंगावधानामुळे अपहरणकर्त्यांचा डाव उधळला गेला.
याबाबत सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे. सावडाव येथील सहावीत शिकणाऱ्या ५ मुली आणि तिसरीत शिकणारा एक मुलगा शाळेच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात चालत असताना एका निर्जन ठिकाणी एक ओमनी/इको कार त्यांच्या जवळ थांबली आणि त्यातून दोघा इसमांनी उतरून मुलांना चाकूचा धाक दाखवून गाडीत बसण्यास भाग पाडले आणि गाडी जंगलाच्या दिशेने सुसाट वेगाने सोडली. गाडीच्या काचा बंद केल्या तसेच रस्त्यात एका ठिकाणी या मुलांची दप्तरे बाहेर टाकून देण्यात आली. काही अंतर कापल्यावर रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणुन त्यांनी गाडी थांबवली आणि फोन करण्यासाठी ते दोघे गाडीतून उतरले. मुलांनी ही संधी साधून गाडीचा दरवाजा उघडून गावाच्या दिशेने पळ काढला आणि झाला प्रकार ग्रामस्थांना आणि शिक्षकांना सांगितला. ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार कणकवली पोलिसांना कळवला आणि पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. अपहरणकर्त्यांचा माग घेण्यासाठी श्वानपथकालापण पाचारण करण्यात आले आहे.
अघोरी प्रकारासाठी अपहरण?
गाडीत बसल्यावर एका इसमाने त्या मुलांच्या डोक्याला लाल कुंकू लावले त्यामुळे मुलांचे अपहरण काही अघोरी प्रकारासाठी केले जात होते कि काय असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
Vision Abroad