सिंधुदुर्ग: गोवा राज्यात काजू शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. गोवा राज्यात काजूला १२५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव चालला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काजूची आधारभूत किमंत (हमीभाव) प्रतिकिलो १५० रुपये करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जानेवारी पासून शेतकऱ्यांनी विकलेल्या काजूला पूर्वलक्षी प्रभावानुसार अनुदान मिळणार आहे. त्यामुळे यंदा पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान भरून निघणार आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
महाराष्ट्र राज्यात कोकणात आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात काजू उप्तादन होते. काजू हे पीक वर्षातून एकदा येते, कोकणात काजूपीकाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमीन आणि उत्पादन खर्चाचा विचार करता काजूला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे. वेळी-अवेळी पडणारा पाऊस, वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान, उत्पादन खर्चापेक्षा कमी परतावा यामुळे कोकणातील शेतकरी पारंपरिक पिकांकडून काजू पिकाकडे वळला आहे. डोंगराळ भागात जेसीपीच्या साहाय्याने जमीन लागवडीयोग्य बनवून तिथे काजूची रोपे लावण्यात आली. पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या गेल्या. त्यावेळी मिळणारा भाव निश्चित आणि योग्य होता त्यामुळे योग्य परतावा मिळेल या हिशोबाने हा खर्च काण्यात आला. मात्र मागील २ ते ३ वर्षांपासून काजूला मिळणार भाव खूप कमी झाला आहे. आता तर तो १०० रुपये प्रति किलो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता तर नफा तर सोडाच तर शेतकऱ्यांचा झालेला खर्च पण वसूल होत नाही आहे.
वारंवार मागणी करूनही सरकारद्वारे काही ठोस पावले उचलण्यात येत नाही आहेत. महाराष्ट्रातील इतर भागात होणाऱ्या पिकांना सरकार हमी भाव देत आहे मात्र कोकणात होणाऱ्या पिकांना कधी हमीभाव देऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा का मिळत नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोकणातील राजकीय नेते राजकारणातच जास्त व्यग्र असल्याचे दिसत आहे. येथील शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही असे पुन्हा निदर्शनास येत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad