सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर वेत्ये येथे काळ शुक्रवारी एक च्या सुमारास एका खाजगी बस ला अपघात झाला. बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्ता सोडून रस्त्यालगत असलेल्या खाईत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातझालेल्या अपघातात चालकासह क्लिनर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. संबंधित बस गोवा ते मुंबई असा प्रवास करीत होती. अपघातात जखमी झालेल्या चालक व क्लीनरला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खाईत घसरल्यामुळे बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Facebook Comments Box
Related posts:
MSRTC Updates: आगाऊ आरक्षण केल्यास १५ टक्के सूट! एसटीच्या नवीन सवलतीची आजपासून अंबलबजावणी
महाराष्ट्र
IMD Alert | राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; 'या' जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा...
महाराष्ट्र
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे विभाजन होऊन दोन नवीन जिल्हे अस्तित्वात येणार? या बातमीत किती तथ्य?
महाराष्ट्र