Vande Bharat Express : चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे जून पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली. या रेल्वेचा शुभारंभ मडगावहून होईल व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील, अशीही माहिती मिळाली आहे.
संभाव्य वेळापत्रक
या गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी ही गाडी तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाच्या आसपास चालवली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून ५.३० सुटून मडगाव या स्थानकावर दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी १:३० वाजता सुटेल ती मडगाव स्थानकावर रात्री ८:३० वाजता पोहोचेल.
गाडीचे थांबे
या गाडीला कोणते थांबे असतील याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी रत्नागिरी जिल्ह्यात २ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ थांबा या गाडीला मिळण्याचे संकेत आहेत. ठाणे या स्थानकावर या गाडीला थांबा असेल. पनवेल या स्थानकाचे महत्व पाहता या गाडीला येथेही थांबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनकडून थांब्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.
तिकीटदर
वंदे भारत एक्सप्रेस एसी चेअर क्लास आणि एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास या दोन श्रेणीसह चालविण्यात येणार आहे. दोन्ही मिळून एकूण १६ डबे असणार आहेत,त्यात एकूण ११२८ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. चेअर क्लास या श्रेणीचे मुंबई ते मडगाव तिकीट भाडे सुमारे १५८० असेल तर एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासचा तिकीटदर अंदाजे २८७० रुपये एवढा असेल.

Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Facebook Comments Box
Related posts:
Breaking: कोकण रेल्वे ठप्प; अनेक गाड्या रद्द तर लांब पल्ल्याच्या गाडय़ा पर्यायी मार्गाने वळविण्यात आल...
कोकण रेल्वे
Mumbai-Goa Bus Accident: मुंबई गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; तीन ते चार प्रवाशांचा मृत्यू ...
महाराष्ट्र
कोकण रेल्वेची भरती - २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती
कोकण रेल्वे