Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11सदस्यीय एसआयटी लावण्यात आली आहे. या प्रकरणासाठी चार्जशीट दाखल करण्यात आली असून त्यात अनेक खुलाशे करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग लागली आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण वारीशे याला संपवणार आहे असे आरोपी पंढरीनाथ आंबेरकर समोरच्याला म्हणाला आहे. ही कॉल रेकॉर्डिंग आरोपीच्या जप्त केलेल्या मोबाईल फोन मध्ये पोलिसांना मिळाली आहे.
कॉल रेकॉर्डिंग अशी होती
“एकाच काम करायच आहे ….आज करणार त्याचं…..झोप नाही लागणार त्याशिवाय….बातमी वाचली?……वाचली बातमी?…….थांब पाठवतो…. “
या रेकॉर्डिंगतील मजकुरामुळे वारीशे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे चार्जेशीट मध्ये नमूद केले गेले आहे. या चार्जशीट नुसार आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने या आधीही अनेकदा पत्रकार वारीशे यांना त्यांच्या रिफायनरी विरोधी आणि आपल्या विरोधी लिखाणावरून धमक्या दिल्या होत्या. आंबेरकर याने याआधीही रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका सरपंचाच्या २१ वर्षीय मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येत आहे असेही चार्जशीटमध्ये नमूद केले गेले आहे. एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने ही चार्जशीट मिळवली आहे.
नक्की काय घडले होते?
सोमवारी सकाळी म्हणजे 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांनी वॉट्सअपवरील रिफायनरी ग्रुपवर एका बातमीची पोस्ट पाठवली होती.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या बॅनरवर त्यांच्यासोबत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाच्या बातमीचे कात्रण शशिकांत वारिसे यांनी त्या वॉट्सअप ग्रुपवर पाठवले होते.
कोकणातील रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या जाहिरातींसंदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या आसपास शशिकांत वारिसे राजापूर-कोदवली या परिसरातून आपल्या दुचाकी वाहनावरून जात होते. त्याचवेळी तिथे असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने समोरून ‘थार’ गाडी आली. या गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7 फेब्रुवारीला सकाळी त्यांचं निधन झालं. चौकशीअंती ती गाडी रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांची असल्याचे आणि ते चालवत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सीआयटी चौकशी लावावी अशी मागणी करण्यात आली होती.
Facebook Comments Box
Related posts:
सावंतवाडी: गरिबरथ एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या ७०० प्रवाशांच्या मदतीसाठी धावली रेल्वे प्रवासी संघटना
कोकण
मुंबई आणि कोकण पट्ट्यात आज रात्री पाऊस धो धो बरसणार; हवामान खात्याचा धोक्याचा 'रेड अलर्ट' जारी
कोकण
Mumbai Goa Highway: अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी कशेडी घाटात मजबूत हाईट खांबाची पुन्हा उभारणी
कोकण
Vision Abroad