Konkan Railway News: जून महिन्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार चालविण्यात येतात. यावर्षी पावसाळी हंगामात कोकण रेल्वेने या मार्गावरील काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार पावसाळी वेळापत्रकाचा परिणाम खालील गाड्यांवर होणार असल्याचे जाहीर केले आहे.
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक ११/०६/२०२३ ते २९/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
तसेच ही गाडी १०/०६/२०२३ (शनिवार) आणि ३१/१०/२०२३ (मंगळवार) रद्द केली गेली आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १२/०६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२३ ते २९/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
तसेच ही गाडी ३१/१०/२०२३ मंगळवारी रद्द केली गेली आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक ११/०६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
दिनांक ०१/११/२०२३ पासून या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होईल असे जाहीर करण्यात आलेले आहे.
टीप: सदर माहिती रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे. भविष्यात त्यामध्ये रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा.
Facebook Comments Box
Vision Abroad