Ashadhi Vari 2023 |आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. मात्र आळंदीत आज वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. वारकऱ्यांची गर्दी झाल्यानं पोलिसांना वारकऱ्यांना आवरणं कठीण झालं. पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. आळंदीच्या मंदिराबाहेर हा प्रकार घडला आहे. पालखी सोहळ्यावेळी मानाच्या वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र इथं वारकऱ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.
मंदिर परिसरातील वाद मिटला मात्र ज्ञानेश्वर मंदिरासमोर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, घडलेल्या या प्रकरणामुळे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
दरम्यान, आळंदीत (Pune Newsमोठ्या संख्येने वारकरी दाखल झालेत. स्नान करून हे वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे इंद्रायणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम ही तैनात करण्यात आली आहे.
Vision Abroad