सिंधुदुर्ग | मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे अखेर कोरल असोसिएट, राजस्थान या कंपनीकडून सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र ही टोल वसुली काही तांत्रिक अडचणींमुळे थांबविण्यात येत आहे अशी माहिती कोरल असोसिएट कडून देण्यात आली.
टोल वसुली करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळेच ही टोल वसुली बंद करण्यात येत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक रोहन डांगे यांनी दिली. काही दिवसानंतर ही टोल वसुली पुन्हा सुरु करण्यात येईल. सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल मुक्ती द्यावी याबाबत कोणतीही सूचना आलेली नाही. हा निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळविण्यात येईल असेही कोरल असोसिएट कडून स्पष्ट करण्यात आले.
तांत्रिक अडचणी हे जरी कारण दिले असले तरी या टोल नाक्याला होणार्या विरोधामुळे ही टोल वसुली बंद करण्यात आली आहे हे स्पष्ट आहे.