Barsu Refinery | बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला होणारे आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. येत्या २० जुलैला विधान भवनावर मोर्चा काढण्याची योजना बारसू रिफायनरी विरोधी समितीने आखली आहे . यासंबंधी समितीचे एक महत्वाची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली आहे. या समितीबरोबर राज्यातील आणि देशातील काही संघटना देखील या मोर्चात सामील होणार आहेत. या मोर्चाला १ लाखापेक्षा जास्त विरोधक एकत्र जमवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
असा असणार हा मोर्चा
दिनांक २० जुलै रोजी राणीची बाग ते आझाद मैदान या दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विधानभवनावर कूच करून सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला पर्यावरण घातक प्रकल्प म्हणून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा विरोध झुगारून येथे माती परीक्षण करण्यात आले असून सरकारतर्फे आपली मनमानी करताना दिसत आहे, मात्र ‘एकाच जिद्द; रिफायनरी रद्द’ या घोषवाक्याखाली समितीने आंदोलन घडले असून जोपर्यत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी समितीची भूमिका आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad