मुंबई | गणेश नवघरे : मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची फक्त आश्वासने भेटत असून त्याची पूर्तता केली जात नसल्याने जनआक्रोश समितीने सरकारला धारेवर धरण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
खरडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. दररोज किमान 1 किलोमीटर रस्त्याचे काम अपेक्षित असताना गेल्या 4 महिन्यात 14 किलोमीटर रस्त्याचे काम सुद्धा झालेले नाही आहे. गणेशचतुर्थी दीड महिन्यावर आली आहे पण रस्ता वाहतुकीसाठी योग्य झाला नाही आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही या कारणाने हे धरणे आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त कोकणवासीयांनी यात प्रत्यक्ष हजर राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जनआक्रोश समिती तर्फे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आहे.
Vision Abroad