आझाद मैदान येथे काल दिनांक २ऑगष्ट २०२३ रोजी जनआक्रोश समितीने मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामा विरोधात धरणे आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान समितीने प्रशासना समोर आपल्या मागण्या ठेवून त्या मागण्या गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन करू अशा इशारा दिला आहे.
मुबंई | गणेश नवगरे : मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १३ वर्षापासून रखडले आहे.कोकणातील सर्व जनता या महामार्गावरून प्रवास करताना जिव मुठित घेऊन प्रवास करीत आहेतसदर महामार्गावर आजपर्यंत ३००० ते ३५०० कोकणकराना आपला प्राण गमवावा लागला आहे तर दहा हजार पेक्षा जास्त कोकणकर जखमी झाले आहेत.
मुंबई गोवा महामार्ग ३१ मे २०२३ पर्यन्त एक मार्गिका पूर्ण करण्यात येईल ऐसे आश्वासन सार्वजनिक मंत्री यांच्यावतीने देण्यात आले.परंतु ३१ मे पर्यंत कोकणकरांचा सुखकर प्रवास होईल अशा पद्धतीने खड़्डे देखील भरण्यात आले नाही.सद्यस्थितीत महामार्गाची दयनीय अवस्था असून महामार्ग मृत्युचा सापळा बनत चाललेला आहे.सार्वजनिक मंत्री यांच्याकडून देण्यात आलेल्या नविन तारखेनुसार गणेशोत्सव पूर्वी एक मार्गिका पूर्ण होईल याची शाश्वती दिसत नसल्याने आज आम्ही समस्त कोकणकरांच्या वतीने खालील मागण्यांसाठी आझाद मैदान येथे ऍड.सुभाष सुर्वे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
१)मागील १३ वर्षांपासून रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा व त्वरित महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत.
२)महामार्गांवर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कोकणकरांच्या नातेवाईकांना त्वरित मदत देण्यात यावी.
३) महामार्गाच्या कामात विलंब झाल्याने खर्चात वाढ किती प्रमाणात झाली व विलंब का झाला तसेच विलंब केलेल्या अधिकारी ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची नावे कळावीत व रखडविण्यास कारणीभूत असलेल्या अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यावर फौजदारी दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे.
४)मुंबई गोवा महामार्गाची श्वेतपत्रीका काढण्यात यावी.
५)महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलनाके चालु करू नयेत.
६)मुंबई गोवा महामार्ग अपघातास कारणीभूत ठरत असल्याने मुंबई पुणे द्रूतगती महामार्गांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल आकारू नये.
७)महामार्गांवर ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावेत.
वरील सर्व मागण्या गणेशोत्सवपूर्वी पूर्ण न झाल्यास समस्त कोकणकरांच्या वतीने पळस्पे ते झाराप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
Vision Abroad