मुंबई : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून या महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उद्या शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई गोवा महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत आहेत. या महामार्गावर एका भल्यामोठ्या खड्ड्यात एक तरुणाने उतरून पोहण्याचा बनवलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे व्हिडिओ याचिकाकर्ते अॅड ओवेस पेचकर यांनी न्यायालयात सादर करून गंभीर स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या व्हिडिओची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने दखल घेतली असून त्याबाबत उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.
प्रतिज्ञापत्रकात पुन्हा खोटा दावा.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आत्ताच आपले प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात फक्त दीड किलोमीटर भागात काहीश्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे नमूद केले आहे. मात्र खरी परिस्थिती वेगळी आहे. इंदापूर ते कासू दरम्यान खूप मोठे खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. यावरून नेहमीप्रमाणे NHAI अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे.