रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील वसई रोड रेल्वे स्टेशन महाराष्ट्र आणि सावंतवाडी , सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष ट्रेन सुरु करण्यात यावी यासाठी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी या गाडीच्या मागणीचे निवदेन रेल्वे मंत्र्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की , मोठ्या संख्येने कोकणातील लोक वसई आणि जवळपासच्या भागात काम आणि व्यवसाय इत्यादीसाठी राहतात. ते त्यांचे मूळ गाव कोकण ते वसई दरम्यान वारंवार प्रवास करतात. मात्र, सध्या वसई रोड स्थानकावरून सावंतवाडीला जाण्यासाठी थेट नियमित गाडी नाही, त्यामुळे कोकण आणि वसई दरम्यान रेल्वेने ये-जा करण्यासाठी दादर आणि ठाणे ही रेल्वे स्थानके हेच पर्याय उपलब्ध असल्याने त्यांची गैरसोय तर होतेच शिवाय त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोकण रेल्वेमार्गावर वसई रोड ते सावंतवाडी दरम्यान विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. कोकणातील लोकांच्या या मागणीचा अनुकूलपणे विचार करून कोकण रेल्वे मार्गावर वसई रोड स्टेशन (महाराष्ट्र) आणि सावंतवाडी दरम्यान नियमित विशेष ट्रेन त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खा . राऊत यांनी केली आहे
Facebook Comments Box
Vision Abroad