रत्नागिरी: राजापूरमध्ये दुर्मिळ ‘चोहोळा’ प्रजातीचे फुलआढळून आले आहे. राजापूर हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक आणि पर्यावरणप्रेमी ए.के. मराठे यांना राजापूरातील रानतळे परिसरात हे फुल आढळले.
पावसाळ्यात धरतीच्या अंगाखांद्यावर शुभ्र फेसाळ जलप्रपातांचे आणि विविधरंगी रानफुलांचे अलंकार झळकू लागतात. कोकणातील कातळसड्यांवर कापरी कमळ, दीपकाडी, तेरडा, सोनतळ यासारख्या असंख्य फुलांचे गालिचे सजू लागतात. अनेक अनामिक आणि दुर्मिळ फुलेही कुठेकुठे दिसू लागतात. अशाच एका दुर्मिळ ‘चोहोळा’ प्रजातीचे फुल राजापुरात आढळून आलं आहे.
राजापूर हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक आणि पर्यावरणप्रेमी A. K मराठे यांना राजापूरातील रानतळे परिसरात हे फुल आढळलं आणि त्यांचं कुतुहल चाळवलं. या फुलाची छायाचित्रे काढून त्यांनी कुडाळ येथील कातळसडा अभ्यासक सौ. मानसी करंगुटकर यांचे मार्गदर्शन घेतले, असता सदरचे फुल ‘व्हाईट जिंजर लिली’ (White Ginger Lily) कुळातील ‘चोहोळा’ (Chohola) या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातीचे असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
चोहोळा फुलाला स्कॅप्ड जिंजर (Scaped Ginger)असंही म्हटलं जातं. याचं शास्त्रीय नाव Curcuma Scaposa असं आहे. हे कंदवर्गीय वनस्पतीच्या प्रकारात मोडतं. सोनटक्का सारखी मंद सुवासाची चोहोळा फुले अत्यंत आकर्षक दिसतात. शेतीचे बांध, सड्यावरील माती साठलेली जागा अशा ठिकाणी ही फुले आलेली दिसतात. ही एक दुर्मिळ वनस्पती आहे. ही वनस्पती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असल्याने तिच्या संरक्षणाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे.
Facebook Comments Box
Related posts:
स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या जाहीर करण्याची मागणी
कोकण
कोकणात टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात अन गणपती स्पेशल रेल्वे गोवा,कर्नाटक व केरळात
आवाज कोकणचा
गावी जाण्यासाठी तिकिटे मिळाली नाहीत? चिंता नको; कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून धावणार विशेष अनारक्ष...
कोकण
Vision Abroad