मुंबई: मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे , १२ वर्षे का रखडले काम ? जर ४ वर्षात समृद्धी महामार्गाचे काम होते मग कोकणच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही ? निधीची कमतरता नसताना का रखडला ? या आणि अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून )मंत्री यांच्याकडून या विषया बाबत माहिती जाणून घेण्यासाठी एक खुले चर्चा सत्र येत्या रविवारी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले आहे.
गेली १२ वर्षे मुंबई गोवा महामार्ग वगळता कोणत्याही महामार्गावर अपघात झाला तर त्याची शासन दरबारी तात्काळ दखल घेतली जाते,तातडीने मदत जाहीर केली जाते; मात्र कोकणच्या अपघातग्रस्तांवर अन्याय का? या सर्वांना जबाबदार असलेल्या अधिकारी, राजकारणी,लोकप्रतिनिधी यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करीत नाही ? मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्या शिवाय टोल आकारणी सुरु करू नका! अशी मागणी असताना टोल सुरु झाले. या व अशा अनेक विषयांवर विविध संघटनांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांवर आंदोलने केली गेली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून गेल्या एक वर्षात रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची आठ वेळा पाहणी करून विषयाचा गांभीर्याने अभ्यास केला आहे. या कामातील असंख्य अडचणी हुडकून काढल्यामुळेच आता मुंबई गोवा महामार्ग कामाला गती आली असून पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी आपली नावे नोंदविण्यासाठीश्री. जयवंत दरेकर(९८२१५६२५७७) श्री. काका कदम(७५०६२५४४४५) श्री. अक्षय महापदी (८०९७१६७९८७) श्री.राजू मुलुख(८४५१०९७१३६) श्री उदय सुर्वे(७६६६९६५००५) यांच्याशी संपर्क करावा. अशी विशेष सूचनाही केली आहे.
Vision Abroad