मुंबई : गणेश चतुर्थी सण अगदी काही दिवसांवर आला आहे. पुढील एक दोन दिवसांनंतर चाकरमानी गावी जायला लागतील. मात्र अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी केलेल्या टोल माफीच्या घोषणेबाबत अधिकृत शासन निर्णय (जी.आर) जाहीर करण्यात आला नसल्याने ही टोल माफी नक्की देण्यात येणार कि नाही याबाबत प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण नाही झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्यासाठी टोल माफीची घोषणा अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय (जी.आर) अजूनही प्रसिद्ध झाला नसल्याने ही टोलमाफी आहे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुढील एक दोन दिवसांत चाकरमानी गावी जाण्यास सुरवात करतील. जर टोल माफ होणार असेल तर तसे स्टिकर आणि पास मिळवण्यात त्याची यामुळे मोठी दगदग होणार असल्याने शासनाने याबाबत लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी होत आहे.
Facebook Comments Box