रायगड: गेले काही दिवस वर्दळीच्या ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. माणगाव जवळ रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता एसटी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर १९ जण जखमी झाले असून सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.
एसटी बस मुंबई राजापूरकडे ( MH 14 BT 2664 ) जाणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही . अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी काही वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: महत्वाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या 'या' स्थानकावरील वेळांत बद...
कोकण
मोठी बातमी: बळवली-पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाच्या संरेखनात बदल होणार; नवीन डीपीआर येणार..कारण काय...
कोकण
Western Railway Ganpati Special Trains: पश्चिम रेल्वेची गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर; संपूर्ण म...
कोकण