सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकडे जणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ पुढे सरसारवले आहे. सिंधुदुर्गातून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 6 बसेस या रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मधून 2, कणकवलीतुन 3, कुडाळमधून 1 अशा सहा गाड्या या 4:30 ला रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
अनेक भाविक गणेशविसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र काल पनवेल नजीक मालगाडीचे डबे घसरून अपघातामुळे कोकणरेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक पूर्ण बिघडले आहे. जे रेल्वे प्रवासी तिकीट कॅन्सल करतील त्यांना रेल्वे स्थानकामध्ये बस उपलब्ध व्हावी यासाठी ही एसटीने सेवा दिली असल्याचे समजत आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Central Railway Ganpati Special Trains: मध्य रेल्वेची गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर; संपूर्ण माह...
कोकण रेल्वे
संगमेश्वर स्थानकावरील गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपतर्फे पाठ...
कोकण
रत्नागिरी जिल्ह्यातील हॉस्पिटलवर आरोग्यविभागाची धाड; बेकायदेशीर प्रकार घडत असल्याचे उघड
कोकण