सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जपण्यासाठी कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस’, असे नामकरण करावे आणि अन्य मागण्यांचे निवेदन प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्यावतीने रेल्वे प्रशासनास देण्यात आले.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नाव लवकरात लवकर पूर्ण करून त्यास माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकाच्या प्रवेशद्वारावर त्यांचे तैलचित्र लावण्यात यावे, रत्नागिरी स्थानक ते महामार्ग जोडणाऱ्या मार्गास त्यांचे नाव देण्यात यावे. तसेच प्रा. मधू दंडवते यांच्या नावाने एक रेल्वे सुरु करावी किंवा विन्द्यमान गाडीस त्यांचे नाव देण्यात यावे. सावंतवाडी स्थानकास टर्मिनस चा दर्जा देऊन तेथे सर्व गाडयांना थांबा मिळावा या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
दिनांक २६ जानेवारी २०२४ पर्यंत या मागण्यांची अंबलबजावणी करण्यात यावी अन्यथा समितीतर्फे कोकणातील सर्व स्थानकावर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
सावंतवाडीत स्मारक समितीचे निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, भाई देऊलकर, मिहीर मठकर, सागर तळवडेकर यांनी येथील स्थानकात भेट देत याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी रेल्वेस्थानक रिक्षा युनियन अध्यक्ष संदीप बाईत, उपाध्यक्ष श्याम सांगेलकर, अजित सातार्डेकर, प्रदीप सोनवणे, दिलीप तानावडे, सचिन तळकटकर, सुरेंद्र गावडे, सचिन गावकर, अजित वैज, एकनाथ नाटेकर, अशोक गावडे, महेश खडपकर, भास्कर तांडेल आदी उपस्थित होते. या निवेदनावर सुमारे ३२० प्रवाशी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad