नागपूर: मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ”मनातले गडकरी” या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते.
“मुंबई गोवा मार्ग पहिले महाराष्ट्र सरकारला काम दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली 1380 किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही. नागपुरात बाराशे कोटीचा मल्टी मॉडेल हब स्टेशन होतं ते एकदा मी रद्द केलं. पण आता ते स्टेशन रेल्वे बांधत असून 1200 कोटी लॉजिस्टिक कॅपिटल साठी भारत सरकारने दिले. भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार करत आहे वादाचे मुद्दे सोडवले भारतातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनवण्याचा ते स्वप्न आहे ते पूर्ण करेल,” असेही नितीन गडकरी म्हणाले.
विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबई गोवा महामार्ग रखडल्याची जबाबदारी स्वतःवर घेतात..#mumbaigoahighway#nitingadkari pic.twitter.com/h7o0c49r2W
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) October 21, 2023
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न होण्यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डला सुचवल्या ...
कोकण
चिपळूणसाठी स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडण्यात यावी - जल फॉउंडेशनची रेल्वेकडे मागणी
आवाज कोकणचा
महत्वाचे: सोमवारपासून कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक लागु होणार; रेल्वेने जाहीर केलेले वेळापत्रक ये...
कोकण
Vision Abroad